चांदवड : भाजपाने चांदवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे डॉ. राहुल आहेर यांचे नातलग असलेले केदा आहेर नाराज झाले आहेत. नाराजी जाहीर करण्यासाठी ते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. डॉ. राहुल आहेर यांनी काही दिवसांपूर्वी केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जाहीररित्या केली होती. पण भाजपाने डॉ. राहुल आहेर यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.