Sunday, August 31, 2025 06:31:44 AM

Asian Shooting Championship 2025 : भारतीय नेमबाजाची चमकदार कामगिरी! आणखी एक पॉइंट मिळाला असता तर..

अनिशची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे या वर्षी त्यानं पेरूमधील लिमा येथे झालेल्या विश्वचषकात रौप्य पदक जिंकले होते.

asian shooting championship 2025  भारतीय नेमबाजाची चमकदार कामगिरी आणखी एक पॉइंट मिळाला असता तर

नवी दिल्ली : कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवार 27ऑगस्ट 2025 रोजी  झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत (Asian Shooting Championships 2025) भारतीय नेमबाज अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल (25m rapid fire pistol) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. 22 वर्षीय अनिशची सुवर्ण कामगिरी फक्त एका गुणाने हुकली. त्याने 35 गुण मिळवले, चीनच्या सुवर्णपदक विजेत्या शू लियानबोफानपेक्षा फक्त एक गुण कमी पडला. कांस्यपदक कोरियाच्या ली जेक्युनने जिंकले.

अनिश पहिल्या चार सीरीजमध्ये एका गुणाने आघाडीवर होता, परंतु त्यानंतर तो मागे पडला. या स्पर्धेत सहभागी असलेला आणखी एक भारतीय आदर्श सिंह पाचव्या स्थानावर राहिला. मंगळवारी 30-शॉट प्रिसिजन राउंडनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2018 सुवर्णपदक विजेता अनिश 290 गुणांसह सहाव्या स्थानावर होता.

हेही वाचा - Diamond League 2025: डायमंड लीग 2025 अंतिम फेरीसाठी 7 खेळाडू निश्चित; नीरज चोप्राचाही समावेश

हरियाणाचा नेमबाज बुधवारी रॅपिड फायर राउंडमध्ये 293 गुणांसह एकूण 583 गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला. सहा खेळाडूंच्या अंतिम सामन्यात अनिशने 18-17 अशी आघाडी घेतली होती, परंतु उर्वरित तीन सीरीजमध्ये पाच शॉट्स चुकवल्यामुळे त्याला चीनच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला.

26 ऑगस्ट रोजी अनिशने सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले -

अनिशची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे या वर्षी त्यानं पेरूमधील लिमा येथे झालेल्या विश्वचषकात रौप्य पदक जिंकले होते. दोन वर्षांपूर्वी कोरियातील चांगवोन येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनिश भानवाला यांनी कांस्यपदक जिंकले होते. मंगळवारी अनिश (583), आदर्श सिंह (585) आणि नीरज कुमार (570) या त्रिकुटाने एकूण 1738 गुण मिळवून या स्पर्धेतील सांघिक रौप्य पदक जिंकले. दक्षिण कोरियाने एकूण 1748 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 50 मीटर पिस्टल स्पर्धेत, अमनप्रीत सिंग (543), योगेश कुमार (548) आणि रविंदर सिंग (542) यांच्या संघाने एकूण 1633 गुणांसह रौप्य पदक जिंकले.

हेही वाचा - Online Gaming Bill 2025: ऑनलाइन गेमिंग बॅनचा फटका! भारतीय क्रिकेटपटूंचे करोडोंचे करार धोक्यात

इराणने 1652 गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर दक्षिण कोरियाने (1619) कांस्यपदक जिंकले. वैयक्तिक अंतिम फेरी बुधवारी होणार आहे. पुरुषांच्या 50 मीटर पिस्टल ज्युनियर स्पर्धेत, अभिनव चौधरी (541), उमेश चौधरी (529) आणि मुकेश नेलावल्ली (523) या त्रिकुटाने दोन संघांच्या स्पर्धेत 1593 गुणांसह सुवर्णपदक जिंकले तर कझाकस्तान (1580) दुसऱ्या क्रमांकावर राहिला.


सम्बन्धित सामग्री