Monday, September 01, 2025 05:16:33 PM

'जरांगे, मानसिक संतुलन सांभाळा'

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना टोमणा लगावलाय.

जरांगे मानसिक संतुलन सांभाळा

जालना : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना टोमणा लगावलाय. 'उपोषणादरम्यान चिडचिड निश्चित होते, पण मानसिक संतुलन ढळता कामा नये. डॉक्टर हे आपले दैवत आहे. ते जीव वाचवतात. डॉक्टरांना कुठे जात-पात पक्ष असतो. त्यामुळे त्यांना शिवीगाळ करणं किंवा त्यांना वाईट बोलणं हे खरंतर संतुलन ढासळल्याचं लक्षण आहे. आम्ही पण उपोषण करतो पण डॉक्टरांना रक्तं देतो. डॉक्टर तपासत असतील त्यांना तपासू देतो. ते सुई टोचत असतील तर टोचून घेतो. डॉक्टरांना काहीबाही बोलत नाही;' असे लक्ष्मण हाके म्हणाले.


सम्बन्धित सामग्री