Wednesday, August 20, 2025 10:47:57 PM

Vande Bharat: महाराष्ट्राला मिळणार दोन स्लीपर वंदे भारत

एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्राला दोन स्लीपर वंदे भारत मिळणार असल्याचं समोर आलंय.

vande bharat महाराष्ट्राला मिळणार दोन स्लीपर वंदे भारत

महाराष्ट्र : एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्राला दोन स्लीपर वंदे भारत मिळणार असल्याचं समोर आलंय. संपूर्ण देशामध्ये सद्य शंभरपेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन धावत आहेत. परंतु आता विशेष म्हणजे स्लीपर वंदे भारत धावणार असल्याने याचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नागपूरमधून स्लीपर वंदे भारत धावणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नागपूर आता स्लीपर वंदे भारतचा मानकरी ठरणार असल्याच्या चर्चा आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे स्लीपर वंदे भारत? 
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेची एक अत्याधुनिक आणि आरामदायी स्लीपर ट्रेन आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये 16 डबे असतील, ज्यात थ्री-टायर एसी, टू-टायर एसी आणि फर्स्ट क्लास एसी असे तीन प्रकारचे डबे समाविष्ट आहेत. प्रत्येक डब्यात आधुनिक सुविधांसह प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. 

या ट्रेनचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत असेल, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद आणि आरामदायी सेवा मिळेल. प्रवाशांच्या सुविधांसाठी ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवासादरम्यान ताजेतवानेपणाचा अनुभव मिळेल. 


 


सम्बन्धित सामग्री