Monday, September 01, 2025 01:27:44 AM

धुळे शहरात महाराष्ट्रातील पहिली कार्डियाक लॅब रुग्णांच्या सेवेत दाखल

विशेष म्हणजे, या ठिकाणी तपासणी आणि उपचारांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. रुग्णांना केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्ड सादर करावे लागणार असून त्याआधारे तपासणी आणि उपचार उपलब्ध होणार आहेत.

धुळे शहरात महाराष्ट्रातील पहिली कार्डियाक लॅब रुग्णांच्या सेवेत दाखल

धुळे : हृदयरोगाशी संबंधित रुग्णांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खान्देशातील आणि महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक कार्डियाक लॅब धुळे शहरात सुरू करण्यात आली आहे. तब्बल 18 कोटी रुपये खर्चून या लॅबची उभारणी करण्यात आली असून हृदयरोग उपचारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध - या लॅबमध्ये दहा बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून, उच्च तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेली अत्याधुनिक मशिनरीही उपलब्ध आहे. हृदयरोग उपचारांशी संबंधित तपासण्या, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यांसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया येथे मोफत करण्यात येणार आहेत.

तपासणीसाठी मोफत सेवा - विशेष म्हणजे, या ठिकाणी तपासणी आणि उपचारांसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही. रुग्णांना केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्ड सादर करावे लागणार असून त्याआधारे तपासणी आणि उपचार उपलब्ध होणार आहेत.

प्रशासनाची माहिती -  जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय देवगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयरोग रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या खर्चाची चिंता करण्याची गरज राहणार नाही. ही लॅब गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक रुग्णांना उच्च दर्जाचे उपचार मिळतील.

👉👉 हे देखील वाचा : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री पवारांची ?

आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भर - धुळे शहरातील ही लॅब आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांसह रुग्णांना दिल्या जाणाऱ्या या मोफत सेवेमुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. ही लॅब हृदयरोगाशी संबंधित उपचारांसाठी एक आदर्श उदाहरण ठरण्यासाठी सज्ज असून, या उपक्रमामुळे आरोग्यसेवांमध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


 


सम्बन्धित सामग्री