Wednesday, August 20, 2025 08:15:02 AM

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर

शपथविधीला आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे आणि युतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे.

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी संभाव्य मंत्र्यांची यादी समोर
MANUNILE

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड विजय मिळवला, मात्र 11 दिवस उलटल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीत एकत्र येऊन 288 जागांपैकी विधानसभेत 230 जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. तथापि, मुख्यमंत्री कोण होणार यावर अजूनही गूढ कायम आहे, परंतु महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांसह देशभरातील मान्यवर, संत-महंत, धर्मगुरू यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधीला आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे आणि युतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे.

पाहूया भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये कुणाकुणाची नावे आहेत. - देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा / राहुल नार्वेकर, नितेश राणे,गणेश नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, रविंद्र चव्हाण. 

तसेच शिवसेनेची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कुणाचे नाव आहेत - एकनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत. 

राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य मंत्र्यांची यादीत यांची आहेत नावे - अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दत्ता भरणे, संजय बनसोडे, इंद्रनिल नाईक. 

या लॉटरीमध्ये कोणाचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होईल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरेल, परंतु 5 डिसेंबरच्या शपथविधी सोहळ्यात कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेतो यावर महायुती सरकारची अंतिम मंत्रिमंडळाची रूपरेषा स्पष्ट होईल.


सम्बन्धित सामग्री