Thursday, September 04, 2025 01:06:22 AM

महायुतीच्या वचननाम्याची झलक

महायुतीच्या वचननाम्याची झलक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन दिली.

महायुतीच्या वचननाम्याची झलक

मुंबई : महायुतीच्या वचननाम्याची झलक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन दिली. या ट्वीटमध्ये 'ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!' असे नमूद करत लवकरच वचननामा जाहीर करणार असल्याचे संकेत महायुतीच्यावतीने फडणवीस यांनी दिले.

फडणवीसांनी ट्वीट केलेल्या वचननाम्यानुसार महायुती सत्तेत आल्यावर महिला, शेतकरी, वृध्दांना भरभरुन मदत देणार आहे. सध्या महायुती सरकार महिला, शेतकरी, वृध्दांना मदत देत आहे. या मदतीत वाढ केली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले आहे. विकासाचे व्हिजन २०२९ हे प्रारुप सादर करण्यावरही महायुतीचा भर दिसतोय. 

महायुतीच्या जाहीरनान्यात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी २१०० रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात सामील करण्याची घोषणाही करण्यात येणार आहे. 

काय असेल जाहीरनाम्यामध्ये? 

  1. लाडक्या बहिणींना प्रतिमाह २१०० रूपये      
  2. महिला सुरक्षेसाठी २५,००० महिलांना पोलीस दलात समावेश करणार
  3. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५०० रूपये 
  4. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन 
  5. वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रूपये देणार
  6. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन
  7. अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्रतिमाह १५ हजारआणि सुरक्षा कवच देणार
  8.  सरकार स्थापनेनंतर 'व्हिजन महाराष्ट्र @ २०२९ सादर  करणार

 


सम्बन्धित सामग्री