Wednesday, September 03, 2025 09:35:59 PM

मेक्सिकोत बारमध्ये गोळीबार, दहा ठार

मेक्सिकोतील क्वेरेटारोतल्या एका बारमध्ये गोळीबार झाला.

मेक्सिकोत बारमध्ये गोळीबार दहा ठार

मेक्सिको सिटी : मेक्सिकोतील क्वेरेटारोतल्या एका बारमध्ये गोळीबार झाला. बारमध्ये चार बंदूकधारी घुसले होते. बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात सात पुरुष आणि तीन महिला अशा एकूण दहा जणांचा मृत्यू झाला. ही माहिती क्वेरेटारो राज्याचे अॅटर्नी जनरल (महाधिवक्ता) आणि शहराचे सुरक्षा प्रमुख यांनी दिली. 

गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. 

मेक्सिकोत १ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत २७८८ हत्या झाल्या आहेत. संघटीत गुन्हेगारी कारवाया आणि अमली पदार्थांची तस्करी याचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री