Monday, September 01, 2025 09:02:50 AM

मंत्री संजय राठोडांच्या वाहनाला अपघात

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात झाला.

मंत्री संजय राठोडांच्या वाहनाला अपघात

यवतमाळ : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला मध्यरात्री अपघात झाला. राठोडांच्या वाहनाने दिग्रस जवळ कोपरा येथे एका मालवाहक वाहनाला अर्थात पिकअपला धडक दिली. एअरबॅग उघडल्यामुळे संजय राठोड आणि त्यांच्या वाहनाचा चालक हे दोघेही वाचले. अपघातात वाहनाचे नुकसान झाले. 

पंतप्रधान मोदी पोहरदेवी येथे येणार आहेत. या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे गेले होते. सर्व कामं आटोपून ते यवतमाळच्या दिशेने निघाले होते. परतीच्या प्रवासावेळी मध्यरात्री राठोडांच्या वाहनाला अपघात झाला.


सम्बन्धित सामग्री