Thursday, September 04, 2025 09:17:10 PM

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेटची) निवडणूक मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेटची) निवडणूक मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर मतदान होणार आहे. आदित्य यांची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात मुख्य लढत होणार आहे. छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांनीही उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, शिवसेनेची विद्यार्थी संघटना यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत.

शिउबाठा युवा सेनेच्या उमेदवारांची नावे  

  1. प्रदीप सावंत
  2. मिलिंद साटम
  3. परम यादव
  4. अल्पेश भोईर
  5. किसन सावंत
  6. स्नेहा गवळी
  7. शीतल शेठ   
  8. मयूर पांचाळ  
  9. धनराज कोहचडे 
  10. शशिकांत झोरे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांची नावे

  1. हर्षद भिडे 
  2. प्रतीक नाईक 
  3. रोहन ठाकरे 
  4. प्रेषित जयवंत 
  5. जयेश शेखावत 
  6. राजेंद्र सायगावकर 
  7. निशा सावरा 
  8. राकेश भुजबळ 
  9. अजिंक्य जाधव 
  10. रेणुका ठाकूर

सम्बन्धित सामग्री