मुंबई : नागपूर येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी दिंडोरी पेठची जागा लढवण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल असा दावा धनराज महाले यांनी केला आहे. माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यामुळे नरहरी झिरवळ यांची चिंता वाढली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.