Monday, September 01, 2025 11:51:57 AM

अक्षयप्रकरणी विरोधकांच्या भूमिकेवर नेटकऱ्यांची टीका

अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आल्यानंतर विरोधकांनी चौकशीची मागणी सुरू केली. विरोधकांच्या या भूमिकेवर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठली आहे.

अक्षयप्रकरणी विरोधकांच्या भूमिकेवर नेटकऱ्यांची टीका

मुंबई : बदलापूरमध्ये शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सोमवारी संध्याकाळी एन्काउंटरमध्ये ठार झाला. अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आल्यानंतर विरोधकांनी चौकशीची मागणी सुरू केली. आधी अक्षयला फाशी द्या अशी मागणी करणारे आता त्याच्या एन्काउंटरच्या चौकशीची मागणी करू लागले. विरोधकांच्या या भूमिकेवर समाजमाध्यमातून टीकेची झोड उठली आहे. पीडित मुलींना न्याय मिळाला आहे, अशी भूमिका व्यक्त करत अक्षयच्या एन्काउंटरच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांवर समाजमाध्यमातून टीका सुरू आहे. 

याआधी अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) नेते अमित ठाकरे यांनी एक एफबी पोस्ट केली. ही एफबी पोस्ट व्हायरल होत आहे. 'बदलापुरा' असे शिर्षक देऊन अमित ठाकरेंनी एफबी पोस्ट केली आहे. पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच; अशी भावना अमित ठाकरेंनी एफबी पोस्टमधून व्यक्त केली आहे. अनेकांनी अमित ठाकरेंची पोस्ट लाईक आणि शेअर केली आहे. 

राज्य शासनाने दिले चौकशीचे आदेश

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा एन्काउंटर झाला आहे. यामुळे नियमानुसार राज्य शासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. 

नेमके काय घडले ?

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षयला तळोजा कारागृह येथून बदलापूरमध्ये नेत होते. ही प्रक्रिया सुरू असताना अक्षयने पोलिसाचे पिस्तुल खेचून घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाला.


सम्बन्धित सामग्री