मुंबई : भाजपाचे निलेश राणे कुडाळ- मालवण मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उदय सामंत, निलेश राणे वर्षा निवासस्थानी पोहचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत अशा चर्चा असतानाच ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले.