Tuesday, September 02, 2025 01:41:57 AM

राज्यसभेवर बिनविरोध निवड

महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागांसाठी बिनविरोध निवड झाली.

राज्यसभेवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागांसाठी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. राज्यसभेचे सदस्य असलेले पीयूष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले हे दोघे लोकसभेवर निवडून आले. नियमानुसार लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर गोयल आणि भोसले यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. महायुतीने परस्पर सामंजस्यातून या जागांसाठी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती.


सम्बन्धित सामग्री