मुंबई : अमराठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मराठी उच्चारातील चूक सुधारली. स्वच्छता मोहिमेसाठी केलेल्या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांनी कचरा शब्द मराठीत चुकीच्या पद्धतीने उच्चारला. ही चूक गायक सुदेश भोसले यांनी अमिताभ यांना सांगितली. चुकीची जाणीव होताच अमिताभ यांनी नव्याने व्हिडीओ केला आणि चूक सुधारली.