Sunday, August 31, 2025 08:34:51 AM

पाकिस्तानातला Business Class चा जुगाड पाहिलात का? Video पाहून डोक्याला हात लावाल!

जुगाडाच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंना पाकिस्तानच्या लोकांनी लक्झरी असे नाव दिले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर लोक पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.

पाकिस्तानातला business class चा जुगाड पाहिलात का video पाहून डोक्याला हात लावाल

Business Class in Pakistan : आर्थिक अडचणी आणि गरिबीशी झुंजणारा पाकिस्तान आपल्या विचित्र कारनाम्यांसाठी अनेकदा जगासमोर हास्यास्पद उदाहरणे ठेवत असतो. आताही असाच विषय आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानने सोशल मीडिया वापरकर्त्यांना स्वतःची खिल्ली उडवण्याची संधी दिली आहे. सोशल मीडियावर लोक पाकिस्तानच्या स्थितीवर खूप चेष्टा करत आहेत. पाकिस्तानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लक्झरी बस दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानमधील या लक्झरी बसमध्ये बिझनेस क्लासच्या जागा कशा असतात हे सांगितले आहे.

पाकिस्तानी स्टाईल बिझनेस क्लासचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
व्हिडिओमध्ये असे दिसून येते की बसमधील सामानाच्या रॅकला "बिझनेस क्लास" सीटमध्ये (business class seat in bus) रूपांतरित करण्यात आले आहे आणि त्याला "पाकिस्तानी स्टाईल बिझनेस क्लास" (Pakistan Style Business Class) म्हटले जात आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की बसमधील सामानाच्या रॅकला थोडासा आलिशान लुक देण्यात आला आहे. बसमधील सीटस् खाली सामानाच्या रॅकमध्ये हलवण्यात आल्या आहेत. व्हिडिओमध्ये, प्रवासी एका अरुंद जागेत आराम करताना दिसत आहेत. पाकिस्तानी लोकांनी हा अनोख्या बिझिनेस क्लासचा अनुभव हसतमुखाने स्वीकारला आहेत आणि ते हा स्वतःसाठी स्वर्ग मानत आहेत. याचीही अर्थातच सोशल मीडियावर मस्करी केली जात आहे.

हेही वाचा - Viral Video: जिवंत झिंगा खाणं पडलं महागात, उलट महिलेवर हल्ला; काय घडलं बघा...

लोकांनी पाकिस्तानची जोरदार खिल्ली उडवली
हा व्हायरल व्हिडिओ @interesting_aIl नावाच्या अकाउंटवरून X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत 1 कोटी 30 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि 98 हजार लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडिओवर वापरकर्ते पाकिस्तानची खूप खिल्ली उडवत आहेत. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केली, "हसा, तुम्ही पाकिस्तानमध्ये आहात!" एका वापरकर्त्याने असेही लिहिले की, "हा खरा बिझनेस क्लास आहे, जिथे जुगाडच सर्वकाही आहे." 

(Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडिया पोस्टवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याला दुजोरा देत नाही.)


सम्बन्धित सामग्री