Sunday, September 14, 2025 03:10:44 PM

Russia Poland Tension : रशिया-पोलंड संबंध तणावात; संघर्षाच्या स्थितीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग? काय आहे आर्टिकल 4?

9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री रशियाच्या एकूण 19 ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. पोलंडच्या लष्कराने त्वरित कारवाई करत हे ड्रोन पाडले. पोलंडच्या मते, हे त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन आहे.

russia poland tension  रशिया-पोलंड संबंध तणावात संघर्षाच्या स्थितीमुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग काय आहे आर्टिकल 4

वॉर्सा (पोलंड) : रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच तणावात असलेल्या जागतिक परिस्थितीत आता पोलंड आणि रशिया यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. रशियाच्या ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याने पोलंडने कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेमुळेच पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी नाटो (NATO) संघटनेचे आर्टिकल-4 लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद झाले आहेत.

नेमकं काय घडलं?
गेल्या 9 आणि 10 सप्टेंबरच्या रात्री रशियाच्या एकूण 19 ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. पोलंडच्या लष्कराने त्वरित कारवाई करत हे ड्रोन पाडले. पोलंडच्या मते, त्यांच्या हवाई हद्दीचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर पोलंडने तात्काळ आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि नागरिकांसाठी अलर्ट जारी केला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनचे अवशेष गोळा केले असून, ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे पोलंडने म्हटले आहे.

हेही वाचा - 'या' देशात 1 लाखांपेक्षा अधिक निदर्शक रस्त्यावर, पोलिसांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

पोलंडची कठोर भूमिका
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी रशियाच्या या आगळीकीला उघडपणे चिथावणी असे संबोधले आहे. "ही घटना अगोदरच्या घटनांपेक्षा अधिक गंभीर आहे. त्यामुळे शक्य असलेली सर्व पाऊल उचलले जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे आणि नाटोच्या आर्टिकल-4 लागू करण्याच्या घोषणेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

नाटोचे आर्टिकल - 4 आणि 5 काय आहेत?
नाटो संघटनेचे दोन महत्त्वाची कलमे, आर्टिकल - 4 आणि आर्टिकल - 5, सध्या चर्चेत आहेत.

नाटो आर्टिकल 4 : या आर्टिकलनुसार, जर नाटो सदस्य असलेल्या कोणत्याही देशाला त्याच्या प्रादेशिक अखंडता, राजकीय स्वातंत्र्य किंवा सुरक्षेला धोका असल्याचे वाटले, तर तो देश इतर सदस्य देशांसोबत यावर चर्चा करू शकतो. या आर्टिकल अंतर्गत संभाव्य धोके आणि त्यांचा सामना करण्याच्या पद्धतींवर सामूहिक सल्लामसलत केली जाते.

नाटो आर्टिकल 5 : हे सर्वात महत्त्वाचे आर्टिकल आहे. या आर्टिकलनुसार, जर कोणत्याही नाटो सदस्य देशावर हल्ला झाला, तर तो हल्ला सर्व सदस्य देशांवर झालेला मानला जाईल. अशा परिस्थितीत इतर सदस्य देश तातडीने लष्करी मदत पुरवण्यासाठी बांधील आहेत.

युद्धाचे संकट?
पोलंडने आर्टिकल 4 लागू करण्याचा उल्लेख केल्यामुळे, हे प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पोलंडने थेट आर्टिकल 5 चा वापर न करता, सुरुवातीला आर्टिकल 4 नुसार नाटो देशांसोबत चर्चा करण्याचा मार्ग निवडला आहे. पण, जर परिस्थिती अधिक बिघडली तर पोलंड आर्टिकल 5 लागू करू शकतो आणि तसे झाल्यास रशियाविरुद्ध नाटो देशांचे लष्कर उभे राहील, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढेल. आता भविष्यात नेमके काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - Sushila Karki Nepal PM : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान, घेतली शपथ


सम्बन्धित सामग्री