बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. आताही लक्ष्मण हाके यांनी जरांगेंबद्दल वक्तव्य केलं. यामुळे लक्ष्मण हाकेंची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके जातीय तेढ निर्माण करतायत. जरांगे - पाटलांबद्दल एकेरी भाषेत बेताल वक्तव्य करतात असं म्हणत काळकुटे हाकेंवर संतापले आहेत.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सतत दोन जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल देखील एकेरी भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत. लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये. अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल. जो कोणी लक्ष्मण हाके यांची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस देऊ अशी घोषणा मनोज जरांगे यांचे समर्थक मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana: अनेक लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केली, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप
दरम्यान, यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्या वक्तव्यावर बोलताना, माझी जीभ कशाला हासडता जीवच घ्या, असे आव्हान लक्ष्मण हाके यांनी केले. मी संविधानिक पद्धतीने वक्तव्य करतो. हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझे वक्तव्य लोकशाहीला धरून आहे. उलट मनोज जरांगे हेच अभद्र आणि शिवराळ भाषेत बोलतात असेही लक्ष्मण हाके म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 तारखेला मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी आणि मराठा आंदोलकांची शाब्दिक बाचाबाची समोर येत आहे.