Death of Peacocks in Karnataka: कर्नाटकच्या हनुमंतपुरा गावात एक अत्यंत चिंताजनक घटना समोर आली आहे. या गावातील ओढ्याजवळील शेतजमिनीत तब्बल 20 मोर मृतावस्थेत आढळले, ज्यामध्ये 3 नर आणि 17 मादी मोरांचा समावेश आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
वन अधिकाऱ्यांची तत्काळ कारवाई -
स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरांचे मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे मृतदेह फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत. मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे. ही घटना काही आठवड्यांपूर्वीच घडलेल्या इतर अनेक अनैसर्गिक वन्यजीव मृत्यूंच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे.
हेही वाचा - दिल्लीत महिला खासदार आर. सुधा यांची सोनसाखळी हिसकावली; गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली तक्रार
चामराजनगर जिल्ह्यात याच महिन्याच्या सुरुवातीला 20 माकडे मृतावस्थेत आढळली होती. या घटनेत प्राथमिक तपासात विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तथापी, जूनमध्ये नर महादेश्वर हिल्स वन्यजीव अभयारण्यात, एका वाघिणी आणि तिच्या चार बछड्यांचे मृतदेह आढळले होते. तपासात निष्पन्न झाले की, गाय खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटनांची मालिका वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
हेही वाचा - Shibu Soren Death: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
फॉरेन्सिक अहवालावर लक्षल -
वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सर्व मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. अहवाल आल्यावरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकते. तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल. दरम्यान, मोर हे भारतीय राष्ट्रीय पक्षी असून त्यांच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवतात. मात्र, अशा घटनांनी जैवविविधतेवर आणि पर्यावरणीय समतोलावर मोठा धोका निर्माण होतो.