Thursday, September 04, 2025 08:23:30 AM

पुण्यात मुसलमानांनी अडवली होती गणपती विसर्जन मिरवणूक

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक अडवण्याचा आरोप, १० ते १२ मुसलमानांवर गुन्हा दाखल

पुण्यात मुसलमानांनी अडवली होती गणपती विसर्जन मिरवणूक

पुणे: येथील स्वारगेट परिसरात गणपती विसर्जन मिरवणूक अडवण्यासाठी नमाज सुरु असल्याचा कारण दाखवून  १० ते १२ मुसलमानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील डायस प्लॉट परिसरात घडली. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुसलमानांवर दंगा घडवण्याच्या उद्देशाने आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी गणपती विसर्जन मिरवणूक अडवण्यासाठी प्रयत्न केले ज्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, संबंधितांच्या कारवाईसाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. गणेश विसर्जनाच्या काळात हिंदूंनी शांतता राखल्याने ताणतणाव रोखता आला. 


सम्बन्धित सामग्री