मुंबई : राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू होऊन अवघे चार दिवस झालेले असतानाच ग्रँट मेडिकल महाविद्यालयात गुरुवारी रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. जे. जे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी द्वितीय वर्षातील दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही विद्याथ्यर्थ्यांची एका वर्षासाठी वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉलेजमधील अँटी रॅगिंग समितीच्या सदस्याने बुधवारी विद्याथ्यर्थ्यांवर रॅगिंग होतानाच प्रकार पहिला आणि त्यानेच हे प्रकरण समितीसमोर ठेवले होते.