मुंबई : राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात गुरूवारी राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारला पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याची मागणी रवि राणा यांच्याकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाकडून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पत्र पाठवण्यात आले आहे. सरकार स्थापन करण्याबाबत हे पत्र त्यांनी राज्यपालांना पाठवले आहे. महाराष्ट्राची १५ वी विधानसभा अस्तित्वात आली असून त्यामध्ये राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचा १ आमदार नवनिर्वाचित म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करावे अशी विनंती रवि राणा यांच्याकडून करण्यात आली आहे.