Sunday, August 31, 2025 06:07:36 AM

7 हजार रुपयांची चिल्लर नाणी मोजण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना लागले पाच तास

&quotचिल्लर नाण्यांच्या तडाख्यात महावितरण कर्मचाऱ्यांचा पाच तासांचा थकवलेला अनुभव!&quot

7 हजार रुपयांची चिल्लर नाणी मोजण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना लागले पाच तास

वाशिम : रिसोड शहर व तालुक्यात महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम जोरात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरांत, दुकाने, आस्थापने, औद्योगिक यांच्याकडून विज बिल वसुली केली जात आहे. काही ग्राहक ऑनलाईन बिल भरण्याचा मार्ग अवलंबत आहेत, तर काही ग्राहक रोख रकमेच्या स्वरूपात विज बिल भरणे पसंत करत आहेत.

पण रिसोड शहरातील एका व्यापारी वीज ग्राहकाने महावितरणच्या वीज बिल वसुली कर्मचाऱ्यांना 100, 200 किंवा 500 नव्हे, तर चक्क 7 हजार 160 रुपयांची 1 व 2 रुपयाची चिल्लर नाणी देऊन टाकली. या नाण्यांचे वजन एकूण 40 किलो असून, त्या ग्राहकाने ती नाणी दुचाकीवर 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या महावितरण कार्यालयात आणली.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या चिल्लर नाण्यांचा मोठा आकडा मोजण्याची जबाबदारी देण्यात आली. तीन कर्मचाऱ्यांनी त्या नाण्यांची मोजणी सुरू केली. या नाण्यांची मोजणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाच तासांचा वेळ लागला. चिल्लर नाण्यांचे एकत्र वजन आणि मोठ्या संख्येने मोजणीमुळे कर्मचाऱ्यांची दमछाक उडाली, परंतु अखेर ते सगळे नाणी मोजून बिल वसुलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यशस्वी झाले.

हा प्रकार ग्राहकांच्या विचित्र वागणुकीचा एक उदाहरण आहे. तसेच, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले आणि वीज बिल वसुलीचे कार्य योग्यरीत्या पार पडले.

👉👉 हे देखील वाचा : ताप्ती गंगा एक्सप्रेसवर काही समाजकंटकांकडून दगडफेक


सम्बन्धित सामग्री