Thursday, August 21, 2025 12:24:47 AM

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम

माहीम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदा सरवणकर विरुद्ध मनसे उमेदवार अमित ठाकरे अशी लढत होणार आहे.

सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम

मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदा सरवणकर विरुद्ध मनसे उमेदवार अमित ठाकरे अशी लढत होणार आहे. सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. यामुळे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आणि शिवसेनेचे माहिमचे विद्यमान  आमदार सदा सरवणकर यांच्यात लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. या बदल्यात अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उभा करायचा नाही अशी महायुतीतील घटक पक्षांची भूमिका आहे. पण सदा सरवणकर यांनी निवडणुकीच्या रिंगणाततून बाहेर पडण्यास नकार दिला. त्यांनी बंड करुन अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर सरवणकर यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 


सम्बन्धित सामग्री