Wednesday, August 20, 2025 03:50:16 PM

शरद पवारांना २४ तासांत माफी मागण्याचा इशारा

शरद पवार, येत्या २४ तासांच्या आत माफी मागा नाहीतर सर्व रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील.

शरद पवारांना २४ तासांत माफी मागण्याचा इशारा

मुंबई : भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्याविरोधात गंभीर इशारा दिला आहे. आचार्य भोसले यांनी स्पष्ट केले आहे की, "शरद पवार यांनी येत्या २४ तासांत माफी मागितली नाही, तर सर्व रामभक्त रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील."

भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, "महाराष्ट्रात जो कोणी प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान करतो, तो प्रत्येकजण शरद पवारांचा माणूस असतो. आत्तासुद्धा ज्ञानेश महाराव नावाच्या प्राण्याने वक्तव्य केले आहे आणि मौलाना शरद पवार तिथे गप्प बसले आहेत कारण त्यांच पूर्ण समर्थन आहे. शरद पवारांनी अशा अनेक माणसांना हिंदू धर्माचा अपमान करण्यासाठी पाळले आहे."

आचार्य भोसले यांनी स्पष्ट केले की, "आता हे सहन करणे शक्य नाही. पवार यांनी माफी मागितली नाही तर सर्व रामभक्त रस्त्यावर येतील आणि पवारांच्या फोटोला जोडे मारतील."
 


सम्बन्धित सामग्री