Sunday, August 31, 2025 04:34:31 PM

शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांची वारी

अकोल्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी वारी काढली.

शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांची वारी

अकोला : अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी वारी काढली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हे साकडं घालण्यासाठी ही वारी काढण्यात आली आहे. अकोला ते शेगाव अशी पायदळ वारी शिवसैनिकांकडून काढण्यात आली आहे.

अकोल्याचे ग्रामदैवत असणाऱ्या राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करीत रात्री या  वारीला सुरूवात झाली. राजराजेश्वर मंदिर, डाबकी रोड, भौरद, गायगाव, निमकर्दा, अडोशी-कडोशी, नागझरी आणि शेगाव अशी ही पायदळ वारी काढण्यात आली. आज सकाळी शिवसैनिकांची ही पायदळ वारी शेगावात पोहोचणार आहे. हे सर्व शिवसैनिक सकाळी गजानन महाराजांचे दर्शन घेत त्यांच्याकडे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी साकडं घालणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विन नवलेंच्या नेतृत्वात ही पायदळ वारी काढण्यात आली आहे.

 

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीची सत्ता स्थापनेसाठी लगबग सुरू आहे. भाजपा आणि शिवसेना या महायुतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी दावा केला जात आहे. शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याची दिसत आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते शिवसैनिकांपर्यंत बऱ्याच जणांना शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे.     


सम्बन्धित सामग्री