Shocking Video of Curd: दही भारतातील बहुतेक सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. हा आरोग्यदायी अन्नपदार्थांपैकी एक पदार्थ आहे. जेवणात फक्त दही किंवा ताकाचा वापर कल्याने अन्नाची चवच वाढत नाही तर त्याउलट हे आपल्या शरीराला दिवसभरातील अनेक पोषक तत्वांची पूर्ती करते. तसेच, यातील बॅक्टिरिया आरोग्य चांगले ठेवतात. दुपारी लोक जेवल्यानंतर त्याचे सेवन करतात, याशिवाय चव वाढवण्यासाठी लोक पदार्थ बनवताना दहीही घालतात. अनेकदा ऐन वेळी दही घरात उपलब्ध नसल्याने ते विकत आणले जाते. मात्र, या विकतच्या दह्याचा असा व्हिडिओ समोर आला आहे की, त्यापेक्षा घरीच दही लावलेले चांगले वाटू लागेल.
बाहेरचे, विकतचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात, हे आपण वारंवार ऐकतो. मात्र, दह्याबाबत आतापर्यंत आपल्या मनात असा विचार आलेला नसेल. खूप वर्षांपासून दुग्ध उत्पादनांमध्ये नाव कमावलेल्या अमूल कंपनीच्या दह्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
हेही वाचा - उड्डाणपुलावरून पाडला नोटांचा पाऊस, पैसे पकडायला लोक धावले; चमत्कारिक प्रकाराचं कारण जाणून डोक्याला हात लावाल..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणानं बाजारतून अमूल कंपनीचं दही विकत आणलं होतं. मात्र ते दही भांड्यात काढताच ते दही त्याला थोडं वेगळं वाटू लागतं. व्हिडीओमध्ये तो दावा करत आहे की, हे दही भेसळयुक्त आहे. हा तरुण दह्याला हात लावूनही बघत आहे, यावेळी त्याला दही चिकट लागत आहे. ज्याप्रमाणे मायोनीज असतं त्याप्रमाणे हे दही चिकट चिकट लागत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता, हे दही सामान्य दही असतं तसं दिसत नाहीये, तर, अतिशय चिकट दिसत आहे. हे पाहूनच यामध्ये काहीतरी प्रक्रिया केल्याचं दिसत आहे. पुढे हा तरुण हे दही खाऊन त्याच्या मित्राचं पोट खराब झाल्याचंही सांगत आहे. तसेच, हा तरुण अमूल कंपनीला विनंती करत आहे की, अशाप्रकारे भेसळ बंद करा..
दरम्यान तरुणानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. त्यानंतर या व्हिडीओवर कंपनीनेही उत्तर दिलं आहे. कंपनीने रिप्लाय करत, 'आम्हाला तुमच्या अनुभवाबद्दल जाणून घेण्याची गरज वाटते. कृपया तुमचा संपर्क क्रमांक, निवासी पत्ता, तुम्ही दही खरेदी केलेल्या आऊटलेटचे नाव आणि बॅच नंबर आम्हाला कळवा. जेणेकरून, आम्ही याचा अधिक तपास करू शकू.' असं म्हटलं आहे.
हेही वाचा - Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'
सोशल मीडियावर हा व्हिडीओ its_vikas_kumawat_73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. विकतचे खाद्यापदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याचे शक्य तितके टाळले पाहिजे. कारण आता विकतच्या सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्हिडीओवर नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.