Wednesday, August 20, 2025 06:19:13 PM

Viral video: आतापर्यंत भेसळ माहीत होती; इथे तर अख्खा कोबीच निघाला 'नकली'; खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्या भाज्या

सध्या खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात आहे. त्यातच फसवणूक रोखण्यासाठी देशातील कायदे कडक नाहीत आणि असलेल्या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही. यामुळे आजारांना आमंत्रण मिळत आहे.

viral video आतापर्यंत भेसळ माहीत होती इथे तर अख्खा कोबीच निघाला नकली खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्या भाज्या

Adulteration in Vegetables Video : अनेकदा वेळ नसल्यामुळे आपण वेगवेगळ्या खेरदी अॅप्सचा वापर करून भाजी, किराणा साहित्य तर कधी तयार जेवण मागवत असतो. घरपोच सेवेची सोय झाली आहे, हे धावपळीच्या जीवनात एका दृष्टीने चांगलंच आहे. लोकही अशा सेवांकडे सकारात्मक नजरेने पाहत आहेत. मात्र, हा व्हिडीओ पाहून अशाप्रकारे भाजी मागवणंही तुमच्याही जीवावर बेतू शकतं, हे लक्षात येईल. 

जलद वितरण अॅप्समुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सोपे झाले आहे. किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत काही मिनिटांत आपल्या दाराशी पोहोचवल्या जातात. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की, एका तरुणानं एका खरेदी अॅपवरुन कोबी मागवला होता. पण त्याच्याकडे पोहोचवण्यात आलेला कोबी चक्क नकली होता. ती कोबीसारखी दिसणारी एक प्लॅस्टिकची वस्तू आहे, असं व्हिडिओतून दिसतंय.

हेही वाचा - Ganga River: भारतात अशी कोणती जागा, तिथं गंगा नदी उलटी वाहते? काय आहे श्रद्धेचा अद्भुत संयोग!

आता समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच स्वतःच्या डोळ्यांदेखत तोडून आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. आता अशा नफ्यासाठी काहीही करण्याच्या प्रकारामुळे कुणाच्या जीवावर कधी बेतेल हे सांगता येत नाही. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोबीसारखा दिसणारा कृत्रिम पदार्थ कसा विकला जातो, हे समोर आले आहे. हा व्हिडीओ पाहून तुमची झोप उडेल हे नक्की..

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण सांगत आहे की, त्याने झेप्टो या फास्ट डिलीव्हरी अॅपवरुन काही भाज्या मागवल्या होत्या. त्यामध्ये कोबी सुद्धा होता. मात्र, दोन दिवस ठेवूनही तो ताजा दिसत असल्यानं तरुणाला शंका आली. त्यानंतर त्यानं हा कोबी बनावट आहे का हे तपासण्यासाठी गॅसवर ठेवला तर ‘बनावट’ खाद्यपदार्थ विकून त्याची फसवणूक झाल्याची खात्री पटली. कारण हा कोबी प्लॅस्टीकप्रमाणे वितळत होता. हा कोबी प्लास्टिकचा असल्याचा तरुणानं दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी तरुणानं कोबीची पाने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला,पण तो पुन्हा अयशस्वी झाला. खरं तर, जळल्यानंतर पान आणखी ‘घट्ट' होते आणि गरम असताना ताणले जाते, एखाद्या प्लास्टिकप्रमाणे, असा दावा या तरुणाने केला आहे. 

सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण, एक म्हणजे भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार विकत घेतात, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा - पैसा-सुख सगळं काही मिळतं! शरीराच्या या भागांवर तीळ असणे शुभ संकेत

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ mokssh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. “आता खायचं तरी काय?” अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. एकानं म्हंटलंय, “लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा” तर आणखी एकानं “आता फक्त जीव घ्यायचा बाकी आहे ”


सम्बन्धित सामग्री