Monday, September 01, 2025 10:22:52 AM

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची विशेष योजना

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने विशेष योजना तयार केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची विशेष योजना

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने विशेष योजना तयार केली आहे. विशेष प्रचारक नितीन गडकरी, राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवे या चार नेत्यांवर विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि दानवे हे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ म्हणून काम करतील. पक्षाने वीस स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्वजण मिळून भाजपाची कामगिरी उंचावण्यासाठी काम करणार आहेत. 

  1. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ
  2. नितीन गडकरी, फडणवीस करणार विधानसभेचं नेतृत्व 
  3. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी

'उद्धव, शरद पवारांची ही शेवटची निवडणूक'

उद्धव आणि शरद पवारांची ही शेवटची निवडणूक असेल, असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


सम्बन्धित सामग्री