मुंबई : काही महिने आर्थिक गर्तेत अडकलेल्या मात्र नंतर तीन हजार कोटी रुपयांचा निधी उभारलेल्या स्पाईसजेटच्या ताफ्यात येत्या एक महिन्यात आणखी १० नवीन विमाने दाखल होणार आहेत. कंपनीनेचे ही माहिती दिली. यापैकी पहिले विमान येत्या १० ऑक्टोबर रोजी दाखल होईल. या दहा विमानांपैकी सात विमाने कंपनी भाडेतत्त्वावर घेणार आहे, तर उर्वरित तीन विमाने कंपनीच्या ताफ्यातच होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ती बंद होती. तीदेखील आता नव्याने सामावून घेतली जाणार आहेत.