Thursday, August 21, 2025 02:13:45 AM

सुप्रिया किडकी बहीण, पडळकरांचा हल्लाबोल

सुप्रिया किडकी बहीण आहे, असा घणाघात भाजपाचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी केला.

सुप्रिया किडकी बहीण पडळकरांचा हल्लाबोल

सांगली : सुप्रिया किडकी बहीण आहे, असा घणाघात भाजपाचे आमदार गोपीनाथ पडळकर यांनी केला. शरद पवार हे जातीयवादाचे विद्यापीठ आहेत. लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करू नका, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

पुरोगामीत्वाच्या बाता हाणायच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवून आणायच्या हे शरद पवारांचे आतापर्यंत राजकारण आहे. पवारांच्या सान्निध्यात राहिलेल्या आणि लहानपणापासून त्यांच्या मार्गदर्शनात शिकलेल्या सुप्रिया सुळेंकडून वेगळी काय अपेक्षा बाळगावी ? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला. लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करू नका... सुप्रिया किडकी बहीण आहे... जसा बाप तशी लेक... असा घणाघात पडळकरांनी केला. पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस पुरुन उरले. फडणवीसांपुढे निभाव लागत नाही म्हणून पवार त्यांच्या जातीवरुन बोलतात, असेही पडळकर म्हणाले. जरांगेही जातीयद्वेषातून फडणवीसांवर टीका करतात, असे पडळकर म्हणाले.


सम्बन्धित सामग्री