मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम झील मेहता (Jheel Mehta) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर त्या संदर्भातील एक खास पोस्ट केली आहे. ज्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. झील मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमुळे लोकप्रिय झाली. या शोमध्ये तिने सोनूची भूमिका साकारली होती. करिअरसाठी तिने हा शो खूप आधी सोडला. तरी देखील आजही लोक तिला तारक मेहतामधील सोनू याच नावाने जास्त ओळखली जातात.
झीलने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे स्पेशल फोटो शेअर केले आहेत. तिने या पोस्टला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. झीलने लिहिलं की, "लग्नाला १०० दिवस बाकी!" असे हटके कॅप्शन देत या फोटोंमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाजात दिसत आहे. तब्बल १०० दिवसांनी झील बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत सात फेरे घेणार आहे. या फोटोंमध्ये ते दोघही एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. तिच्या या लग्नासंबंधित पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे -
- तारक मेहता' फेम सोनूच्या लग्नाची तारीख ठरली
- होणाऱ्या पतीसोबतची रोमँटिक पोस्ट