जालना : जालना जिल्ह्यात ओबीसी - मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. वडीगोद्रीतून अंतरवालीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. ओबीसी-मराठा आंदोलकांमध्ये वाद होत असल्याने पोलिसांनी जरांगे आणि हाके यांच्या समन्वयकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.