Monday, September 15, 2025 07:47:32 PM

जालनातील अंबड येथे गोळीबार; एक जण गंभीर जखमी

जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबाराची घटना घडली होती. घटनेतील आरोपीला लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.

जालनातील अंबड येथे गोळीबार एक जण गंभीर जखमी

जालना जालना जिल्ह्यातील अंबड शहरात अंबड -  पाचोड रोडवरील कैकाडी महाराज चौकातजवळ ही.पी.मल्टी सर्विसेस दुकानासमोर सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत 36 वर्षीय किशोर कुमार गायकवाड गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याने जखमी झाला आहे. या घटनास्थळी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी आज सकाळी अकरा वाजता भेट दिली. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी तीन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. घटनेतील आरोपीला लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; डिसेंबरच्या ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

नेमक काय आहे हे प्रकरण ?

जालन्यातील अंबडमध्ये गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.  किशोर कुमार गायकवाड असे जखमीचे नाव आहे. तो 36 वर्षाचा आहे. किशोर हे हॉटेल चालक असून अंबड येथील शिंदे नगर येथील रहिवाशी आहे. अंबड - पाचोड रोडवर शीरनेर शिवारात असलेले हॉटेल चालविण्यास का घेतले. या कारणावरून हा गोळीबार करण्यात आला आहे. रात्री  साडे नऊ वाजेच्या सुमारास अंबड - पाचोड रोडवर कैकाडी महाराज चौकाच्या बाजूला असलेले व्ही.पी मलटी सर्व्हिसेस समोर येथे घटना घडली. गणेश बाबुराव खरात या आरोपीने फिर्यादी किशोर गायकवाड यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी गणेश खरात याने स्वतःकडे असलेले पिस्तूल काढून फिर्यादी किशोर गायकवाड यांच्या छातीवर गोळी मारत असताना पिस्तूल खालील बाजूला दाबले. यावेळी ती गोळी किशोर यांच्या डाव्या मांडीला लागली आणि ते गंभीर जखमी झाले. जखमीवर जालन्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. अंबड पोलिसात कलम 109, 352, 351(3) नुसार दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.

https://www.jaimaharashtranews.com/politics/good-news-for-dear-sisters-the-money-will-be-credited-to-account-in-december-/32143

 


सम्बन्धित सामग्री