नवी दिल्ली: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद करण्यात आला. त्यानंतर GEN-Z तरुण रस्त्यावर उतरले आणि निषेध करण्यासाठी संसदेत पोहोचले. या तरुणांच्या निषेधाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात तोडफोड, जाळपोळ आणि लाठीचार्ज पाहायला मिळाला. या हिंसक निषेधात सुमारे 20 लोकांचा मृत्यू आणि 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. परंतु तरुणांच्या धाडसाने सरकारला गुडघे टेकायला लावले. यानंतर सरकारने सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली आणि देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो सगळ्यांना आश्चर्यचकित करेल.
हेही वाचा: Nepal Gen- Z Protest: रॅपर, महापौर ते Gen-Z आंदोलकांचे चाहते, कोण आहेत बालेन शाह?
नेपाळच्या रस्त्यांवर जखमी तरुणाचा निषेध
समाज माध्यमावर एका तरुणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण सार्वजनिक व्यासपीठावर माइक घेऊन उभा आहे आणि मोठ्याने बोलत आहे. निषेध करणाऱ्या तरुणांना तो प्रेरणा देत आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याचे संपूर्ण शरीर जखमांनी भरलेले आहे. त्याच्या चेहऱ्यावर खोल जखमा आहेत, ज्यावर मलमपट्टी बांधलेली आहे आणि त्याची छाती पूर्णपणे जखमांनी भरलेली आहे. असे असताना देखील या निषेध करणाऱ्या तरूणाचा उत्साह वेगळ्याच पातळीचा आहे आणि तो मोठ्याने ओरडून आपला मुद्दा मांडत आहे.
हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले आहे आणि लाईक केले आहे. तसेच बरेच लोक या व्हिडीओ प्रतिक्रिया देत आहेत. मी पहिल्यांदाच सोशल मीडियावरील बंदी उठवण्यासाठी इतका उत्साह पाहिला आहे, ही लढाई अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढली गेली आहे, आता भारतीयांनीही टिकटॉकसाठी निषेध केला पाहिज अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओ येताना दिसत आहेत.