Thursday, August 21, 2025 02:09:10 AM

विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात

आजपासून तीन दिवसीय विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजपासून तर ९ डिसेंबरपर्यंतहे विशेष अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे.

विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात

मुंबई : मुंबईतील आझाद मैदावर महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर आता आजपासून तीन दिवसीय विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. आजपासून तर ९ डिसेंबरपर्यंतहे विशेष अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र : दरम्यान विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार शपथ दिली जाणार आहे. विधानसभेचे एकूण 288 प्रतिनिधी आज आमदारकीची शपथ देखील घेणार आहेत. तर पहिल्यांदा निवडून आलेले 78 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार आहे. हंगामी अध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर आज विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत कालिदास कोळंबकर? 

कालिदास कोळंबकर हे यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील वडाळा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. विशेष म्हणजे सगल 9 वेळा आमदार होण्याचा विक्रम त्यांनी स्वत:च्या नावावर केलाय. सन 1990 पासून 2004 पर्यंत त्यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, 2005 मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यानीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2014 मध्ये त्यांनी मोदी लाटेत भाजपात प्रवेश केला. 2024 ते 2024 हा त्यांचा भाजपमधील कालावधी आहे. पण, 1990 पासून 2025 पर्यंत ते सातत्याने विजयी झाल्याने मतदारसंघातील त्यांचा दबदबा दिसून येतो.

अधिवेशनात नेमकं काय होणार? 

शनिवारी सकाळी 11 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होणार असून आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर आणि रविवारीही शपथविधी सुरू राहील. सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाने विधान परिषदेची बैठक सोमवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे.


 


सम्बन्धित सामग्री