Saturday, September 13, 2025 07:58:32 PM

Courage is The Surest Weapon : धैर्य हेच विश्वासू हत्यार.. लहानश्या डुकराने तीन चित्त्यांचा डाव उलटवला! पर्यटकही झाले थक्क; पाहा थरारक Video

हा थरारक व्हिडिओ एका पर्यटकाने जंगल सफारीदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे.

courage is the surest weapon  धैर्य हेच विश्वासू हत्यार लहानश्या डुकराने तीन चित्त्यांचा डाव उलटवला पर्यटकही झाले थक्क पाहा थरारक video

Small Wild Bore Fights 3 Cheetahs : जंगल… नाव ऐकताच डोळ्यासमोर उभी राहते तो थरार, जीवघेणी झुंज आणि जगण्यासाठीची संघर्षमय लढाई. या संघर्षात लहान आणि दुर्बळ प्राणी नेहमीच मोठ्या आणि ताकदवान प्राण्यांची शिकार बनतात, हीच निसर्गाची ओळख. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ ही समजूत पूर्णपणे बदलून टाकत आहे. एका छोट्याशा डुकराने तीन-तीन बलाढ्य चित्त्यांना दिलेली टक्कर पाहून तुम्ही थक्क व्हाल!

हा अविश्वसनीय व्हिडिओ एका पर्यटकाने जंगल सफारीदरम्यान आपल्या कॅमेरात कैद केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला असून तो 'शौर्याची नवी व्याख्या' म्हणून ओळखला जात आहे.

व्हिडीओतील थरारक क्षण
व्हिडिओच्या सुरुवातीला तीन वेगवान आणि क्रूर चित्ते एका लहान डुकराला एकटे पाहून, त्याला घेरण्याचा प्रयत्न करतात. एका क्षणासाठी पर्यटकांचा श्वास थांबतो, कारण त्यांना खात्री असते की, या क्षणी डुकराचा शेवट निश्चित आहे.

हेही वाचा - Parrot Viral Video : पोपटालाही मोबाईलची क्रेझ, कोणी हात लावल तर थेट अटॅक करतो; व्हिडीओ एकदा पाहाच

पण, पुढच्याच क्षणी घडते ती डुकराची अनपेक्षित चाल!
पळ काढण्याऐवजी, त्या लहानशा डुकराने अविश्वसनीय धाडस दाखवले. त्याने आपल्या अंगावर येणाऱ्या चित्त्यांवरच प्रतिहल्ला सुरू केला. "मी शिकार नाही, मीच शिकारी आहे!" हाच जणू संदेश त्याच्या आक्रमकतेतून दिसून येत होता. डुकराच्या या अचानक हल्ल्याने ते तीनही चित्ते गडबडून मागे हटले.

..मग सुरू झाली ती एक अविश्वसनीय लढाई. त्या लहानशा प्राण्याने तीनही चित्त्यांना अक्षरशः पळवून लावलं.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर चर्चा
@latestkruger या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि 12 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. युजर्स प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत. “तीन चित्त्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे”, “हा लहान डुक्कर म्हणजे खराखुरा बॉस ठरला!”

हेही वाचा - OMG! हा माणूस चक्क 6 वेळा मेला आणि परत जीवंत झाला! लोक काय म्हणाले माहीत आहे..?

धैर्याचा विजय
सामान्यतः चित्ता आपल्या वेग आणि शक्तीने कोणत्याही लहान प्राण्याला सहज हरवतो. पण, या व्हिडिओमध्ये चित्त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. डुकराच्या निर्भीड हल्ल्यासमोर ते पळू लागले. हे दृश्य पाहून पर्यटकांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.

व्हिडिओमध्ये जरी डुक्कर आणि चित्त्यांच्या लढाईचा शेवट स्पष्ट झालेला नसला तरी, त्याने दाखवलेले धाडस आणि लढाऊ वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे.

हा व्हिडिओ आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवून जातो: "जर तुमच्यात धैर्य असेल, तर तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याला पराभूत करणे शक्य आहे."


सम्बन्धित सामग्री