Positive Parenting : एका 38 वर्षीय अमेरिकन महिलेने तिच्या जुळ्या मुलींसोबत चक्क एक करार केला आहे. या करारानुसार या मुलींना घरात राहण्याचे भाडे द्यावे लागते. तसेच, इतर खर्चासाठीही पैसे द्यावे लागतात. हे सगळे का केले आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महिलेचे म्हणणे आहे की ती हे फक्त तिच्या मुलीच्या कल्याणासाठी करत आहे. पण कसे, चला जाणून घेऊया.
अमेरिकेतील अटलांटा येथे एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला घरात राहण्यासाठी तिच्याच जुळ्या चिमुकल्या मुलींकडून भाडे आकारते. इतकेच नाही तर,वेळेवर भाडे न भरल्यास ती मुलींना दंड देखील करते. महिलेचे म्हणणे आहे की, हे सर्व त्यांच्या कल्याणासाठी करत आहे. हा सर्व प्रकार समजून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्कीच कौतुक वाटेल.
हेही वाचा - OMG! हा माणूस चक्क 6 वेळा मेला आणि परत जीवंत झाला! लोक काय म्हणाले माहीत आहे..?
जॉर्जियातील 38 वर्षीय ला टोया व्हिटफिल्ड (LaToya Whitfield) ही तिच्या 9 वर्षांच्या जुळ्या मुली ग्रेस आणि ऑटमकडून घरात राहण्यासाठी भाडे आकारते. या अनोख्या पद्धतीमागील उद्देश तिच्या मुलींना पैशाचे आणि आर्थिक जबाबदारीचे महत्त्व शिकवणे आहे.
वृत्तानुसार, हे सर्व तेव्हा सुरू झाले, याचे कारण खूपच विचार करायला लावणारे आहे. तर काय झाले, टोयाच्या मुलींनी तिच्याकडे वारंवार महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आग्रह धरला. जेव्हा टोयाने मुलींना समजावून सांगितले की, तिच्याकडे इतके पैसे नाहीत. तेव्हा मुली लगेच म्हणाल्या, 'तुला तुझा पगार तर नुकताच मिळाला आहे.' हे ऐकून टोयाला समजले की, तिच्या मुलींना पैशांचा वापर कसा करावा, याबाबत काहीच ज्ञान नाही. त्यानंतरच तिने ठरवले की, ती तिच्या मुलींना जीवनातील हा अत्यंत महत्त्वाचा धडा कृतीतूनच शिकवेल.
'प्ले मनी' सिस्टम
यानंतर, टोया हिने तिच्या मुलींसाठी एक बनावट भाडे करार आणि 'प्ले मनी' सिस्टम तयार केली, जेणेकरून त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. याअंतर्गत, ती तिच्या मुलींना दर आठवड्याला पगार म्हणून काही पैसे देते. ज्यातून त्यांना घराचे भाडे आणि वीज, वाय-फाय आणि गॅस सारखे खर्च द्यावे लागतात.
हेही वाचा - Reddit Post Viral : भावाच्या लग्नासाठी मागितली रजा; बॉसनं घातली ही अट, तिला निवड करणं झालं कठीण, वाचा सविस्तर
दंड आणि बोनस
तिने तिच्या मुलींना असेही सांगितले आहे की, जर त्यांनी घर अस्वच्छ केले किंवा वेळेवर भाडे दिले नाही तर त्यांना दंड आकारला जाईल. इतकेच नाही तर, त्यांना घरातून हाकलून देखील लावले जाऊ शकते. याशिवाय, महिला त्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी, चांगले वागण्यासाठी आणि स्वतःचे वाद स्वतः सोडवल्याबद्दल बोनस देखील देते. या पद्धतीमुळे तिच्या मुलींना पैशाचे मूल्य समजेल आणि ते कसे खर्च करावेत, याची समज येईल, असा त्या महिलेचा विश्वास आहे.