Sunday, August 31, 2025 09:28:23 AM

राऊतांचा अपमान डोळ्यादेखत पाहात बसले उद्धव समर्थक

घटनेच्या वेळी शिउबाठा खासदार अनिल देसाई आणि विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उपस्थित होते. यामध्ये उद्धव ठाकरे समर्थक गप्प बसले, हे विशेष लक्षात येते.

राऊतांचा अपमान डोळ्यादेखत पाहात बसले उद्धव समर्थक

मुंबई : संजय राऊत यांच्या काँग्रेसविरोधातील भूमिकेमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांचा पाणउतारा केला आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत राऊतांविषयी प्रश्न विचारला असता, पटोले यांनी त्यांना खिजगणतीतही मोजायचे नाही असे स्पष्टपणे सांगितले.

 

विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी शिउबाठा खासदार अनिल देसाई आणि विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उपस्थित होते. यामध्ये उद्धव ठाकरे समर्थक गप्प बसले, हे विशेष लक्षात येते. संजय राऊत यांचे विधान आणि त्यानंतर पटोले यांचा प्रतिसाद यामुळे राजकीय वातावरण तापले आहे, ज्याने उद्धव समर्थकांच्या असंतोषाला आणखी दिला आहे.

राऊतांच्या या अपमानामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या राजकारणात यामुळे नवे वाद निर्माण होऊ शकतात. 


सम्बन्धित सामग्री