Sunday, August 31, 2025 09:19:38 PM

पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन

पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.

पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 
kasaba ganapti

१७ सप्टेंबर, २०२४, पुणे : पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचे म्हणजेच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. या आधी मानाचा पहिला कसबा गणपती अलका चौकात दाखल झाला. येथे महानगरपालिकेकडून कसबा गणपती मंडळाच्या अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 


अतिशय उत्साहपूर्ण तरीही भावुक वातावरणात पुणेकरांनी कसबा गणपतीला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत  पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 


सम्बन्धित सामग्री