Income Tax Scam: आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सवलत जरी मिळाली असली तरी, ही नवीन तारीख चुकवलीत तर तुम्हाला फक्त उशिराचा दंडच नव्हे तर मोठ्या कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. उशिरा ITR दाखल केल्याने भविष्यात खालील गंभीर तोट्यांना सामोरे जावे लागू शकते.
उशीरा दाखल शुल्क (कलम 234F) -
जर तुम्ही 15 सप्टेंबर 2025 पर्यंत ITR भरला नाही, तर तुम्हाला 5000 पर्यंतचे उशिरा दाखल शुल्क भरावे लागू शकते. तथापि, ज्या करदात्यांच्या करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी हे शुल्क कमाल 1000 रुपये आहे.
थकबाकी करावर व्याज -
जर तुमच्यावर टॅक्स भरायचा बाकी असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 1 टक्के व्याज भरावे लागेल. हे व्याज देय तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून ITR दाखल केल्या जाण्याच्या दिवसापर्यंत लागू होईल. तथापी, जर तुमचा व्यवसाय किंवा भांडवली नफा यामधून तोटा झाला असेल, तर ते पुढील वर्षांमध्ये समायोजित करता येत नाही.
कर लपविल्याबद्दल दंड -
जर तुमचे उत्पन्न करपात्र असूनही तुम्ही ITR भरले नाही, तर आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करू शकतो. तुम्ही वाचवलेला कर किती आहे त्यावर अवलंबून, विभाग तुमच्यावर त्याच्या 50 टक्के पर्यंत दंड लावू शकतो.
हेही वाचा - प्रीमियम भरला, पण क्लेम मिळाला नाही? 'या' 5 चुकांमुळे विमा कंपनीला मिळते तुमचे पैसे लुटण्याची संधी
तुरुंगवास आणि खटला -
आयकर प्राधिकरणाला कर चुकवणाऱ्या करदात्यांना खटला चालवण्याचा देखील अधिकार आहे. यामध्ये किमान 3 महिने ते 2 वर्षे तुरुंगवास आणि दंड समाविष्ट असू शकतो. जर कर चुकवेगिरीची रक्कम 25 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुरुंगवासाची शिक्षा 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत असू शकते. तथापि, जर करचुकवेगिरीची रक्कम 10 हजारपर्यंत असेल, तर कोणताही खटला दाखल केला जात नाही.
हेही वाचा - LIC Saving Plans: एलआयसीच्या 'या' 4 योजनांमध्ये गुंतवा पैसे, आयुष्यभर राहणार नाही पैशांची चिंता
बनावट कागदपत्रे दाखवणाऱ्यांची खैर नाही -
तथापी, बरेच लोक हुशारीच्या नावाखाली बनावट सूट, कपात, खर्च दाखवतात. पण हे धोकादायक आहे. जेव्हा आयकर विभागाला याबद्दल माहिती मिळते तेव्हा ते संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवते. जो कोणी अशा प्रकरणात अडकतो, तो स्वतःला वाचवण्यासाठी सीएच्या मागे धावतो. परंतु, याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे ITR वेळेत दाखल करणे हे कायद्याचे पालन आणि स्वतःच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.