Best Cooking Oil: आपल्या दैनंदिन आहारात तेलाचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. जेवणात वापरले जाणारे तेल केवळ चव वाढवत नाही तर आरोग्यावरही थेट परिणाम करते. त्यामुळे कोणते तेल वापरायचे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. जास्त प्रमाणात तेल खाणे टाळणे आणि योग्य प्रकारचे, पोषक गुणधर्म असलेले तेल रोजच्या स्वयंपाकासाठी वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतीय स्वयंपाकात डाळी, भाज्या, पराठे करण्यासाठी दररोज तेलाचा वापर केला जातो. अशा वेळी जर आपण चुकीचे तेल वापरले, तर ते दीर्घकाळ आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोजचे जेवण बनवण्यासाठी कच्च्या घाण्याचे (Cold-Pressed) किंवा नैसर्गिक पद्धतीने बनवलेले तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते. तज्ञांच्या मते एकाच प्रकारचे तेल दीर्घकाळ वापरण्याऐवजी, वेगवेगळ्या प्रकारचे तेल बदलून-बदलून वापरणे चांगले ठरते. यामुळे शरीराला विविध पोषक तत्वांचा पुरवठा होतो.
हेही वाचा - रिकाम्या पोटी कधीही हे पदार्थ खाऊ नका; अन्यथा, आरोग्यावर होतात मोठे दुष्परिणाम
स्वयंपाकासाठी कोणते तेल सर्वोत्तम आहे?
मोहरीचे तेल -
मोहरीचे तेल हे मोनो-सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडने भरलेले असते, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. हृदयासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा स्मोक पॉइंटही जास्त असल्यामुळे ते उच्च आचेवर शिजवण्यासाठी योग्य आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.
शेंगदाण्याचे तेल -
हेही नैसर्गिक तेल आहे आणि तळण्यास चांगले मानले जाते. त्यात देखील हृदयासाठी फायदेशीर असणारे फॅटी अॅसिड आढळतात.
नारळाचे तेल -
विशेषतः दक्षिण भारतात वापरले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे तेलही चवदार आणि पोषणमूल्यांनी भरलेले आहे.
तीळाचे तेल -
हिवाळ्यात वापरण्यासाठी उत्तम. यामध्ये उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात. सांधेदुखी किंवा थंडीमुळे होणारे त्रास कमी करण्यात मदत करते.
हेही वाचा - Low BP In Youth : तरुणांमध्ये कमी रक्तदाबाची समस्या वाढतेय; ही आहेत मुख्य कारणं
स्वयंपाकासाठी तेल निवडताना केवळ चव पाहू नका, तर त्याचे आरोग्यदायी फायदे, स्मोक पॉइंट आणि प्रक्रिया कशी झाली आहे, हेही लक्षात घ्या. शक्यतो रिफाइन्ड तेल टाळा आणि घाण्याचे किंवा वूड प्रेस्ड तेल वापरा. हृदय, कोलेस्ट्रॉल, वजन आणि पाचनतंत्र या सर्व गोष्टींचे संतुलन राखण्यासाठी योग्य तेलाची निवड ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)