बारामती : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान चालू झाले आहे. अशातच सुरूवातीच्या दोन तासातच ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यानंतर ईव्हीएम चालू होऊन सुरळीत मतदान सुरू आहे. दरम्यान बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी मतदानाच्यावेळी मोबाईल वापरल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. मतदान करताना मतदान कक्षात मोबाईल वापरण्यावर बंदी असताना बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार मोबाईल कसे वापरू शकतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.