मुंबई : व्होट जिहाद प्रकरणी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांची चौकशी सुरू आहे. नोमानींची चौकशी सुरू झाल्याची माहिती भाजपाच्या किरीट सोमैया यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिली. नोमानींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत 'एक ऐसा व्होट जिहाद करो... जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही...तो दिल्ली है...' असे नोमानी बोलताना दिसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा व्होट जिहाद, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सैफ है... याची चर्चा सुरू झाली आहे. व्होट जिहादचे आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानींविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या किरीट सोमैयांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. परभणीचे निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी नोमानी प्रकरणी त्यांचा अहवाल लवकरच निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याचे सोमैया यांनी सांगितले.