पती-पत्नीचा नातेसंबंध हा अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. एकीकडे हा नाता मजबूत आणि अतूट मानला जातो, तर दुसरीकडे तो नाजूक आणि संवेदनशीलही असतो. जरा सा गैरसमज किंवा गोष्टी लपवण्याचा प्रयत्न संपूर्ण नात्याला तडे देऊ शकतो. म्हणूनच दोघांनीही पारदर्शकता ठेवणं आवश्यक आहे. मात्र, काही गोष्टी अशा असतात ज्या बहुतांश पुरुष आपल्या पत्नीपासून लपवतात. यामागे काही वैध कारणे असतात. चला तर मग जाणून घेऊया अशा पाच गोष्टी ज्या पुरुष सहसा आपल्या पत्नीशी शेअर करत नाहीत.
1. आर्थिक स्थिती पूर्णपणे शेअर करत नाहीत
पत्नीला पतीच्या कमाईची आणि एकूण आर्थिक परिस्थितीची काहीशी कल्पना असते. पण पुरुष अनेकदा संपूर्ण तपशील सांगण्याचे टाळतात. विशेषतः आर्थिक अडचणीत असताना ते हे अधिकच लपवतात. यामागचे कारण म्हणजे ते पत्नीला तणावात टाकू इच्छित नाहीत किंवा घरात कोणताही वाद होऊ नये यासाठी ते खर्च आणि बचतीविषयी फारसे बोलत नाहीत.
हेही वाचा : Pune: धक्कादायक! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा थरार
2. भावनांना लपवतात
पुरुष आपली दुःख, वेदना आणि भीती याबाबत पत्नीशी फारसे बोलत नाहीत. यामागे सामाजिक मानसिकता मोठ्या प्रमाणात जबाबदार असते. ‘पुरुष रडत नाहीत’ किंवा ‘त्यांनी नेहमीच कठोर राहायला हवं’ असे विचार पुरुषांमध्ये रुजलेले असतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, भावना व्यक्त केल्याने ते पत्नीसमोर कमकुवत ठरतील.
3. ऑफिसच्या तणावाविषयी बोलत नाहीत
कार्यालयातील तणाव, कामाचा दडपण आणि बॉसचा राग यामुळे पुरुष कधी कधी मानसिकरित्या अस्वस्थ असतात. पण तरीही ते हे सर्व आपल्या पत्नीशी शेअर करत नाहीत. त्यांना वाटतं की, असे केल्याने पत्नीला उगाचच चिंता वाटेल किंवा ती अधिक प्रश्न विचारेल. त्यामुळे ते हे सगळं मनातच ठेवतात, पण त्याचा परिणाम त्यांच्या स्वभावावर आणि घरातील वातावरणावर होतो.
हेही वाचा : नखांवरून समजेल तुम्ही किती वर्ष जगाल
4. भूतकाळातील नातेसंबंध गुप्त ठेवतात
प्रत्येकाचं भूतकाळात काही ना काही प्रेमसंबंध असतात, पण पुरुष सहसा हे विषय आपल्या पत्नीसमोर आणू इच्छित नाहीत. त्यांना वाटतं की, जर त्यांनी भूतकाळातील नातेसंबंध सांगितले, तर पत्नी असुरक्षित वाटू शकते किंवा तिच्या मनात संशय येऊ शकतो. त्यामुळे अनेक पती जुन्या नात्यांबाबत काहीही बोलत नाहीत.
5. आरोग्यविषयी माहिती देत नाहीत
काही वेळा पुरुष आपल्या आरोग्यासंदर्भातील समस्या पत्नीपासून लपवतात. त्यांना वाटतं की, जर त्यांनी हे सांगितले तर पत्नी अधिक काळजी घेईल आणि घरात तणाव निर्माण होईल. काही पुरुष तर लहानसहान आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात आणि उपचार करण्यास टाळाटाळ करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.