Hibiscus Tea Made up of Shoe Flower : जास्वंदाच्या फुलांचं कोणत्याही पूजनातील महत्त्व मोठं आहे. याचं धार्मिक बाबतीत खूप महत्त्व आहे. जास्वंदाची विविध रंगछटा असलेली झाडं ठिकठिकाणी पाहायला मिळतात. घराच्या आजूबाजूच्या परिसरात जास्वंदाच्या फुलांचं झाड हमखास लावलं जातं. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, की जास्वंदाच्या फुलांचा आरोग्याला खूप फायदा होतो.
जास्वंदाच्या फुलाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. त्याचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप असे फायदे होतात, असे तज्ज्ञ सांगतात. जास्वंदाच्या फुलाचा चहा आपण जर करून प्यायला तर त्याचे देखील भरपूर अशी फायदे आपल्या शरीराला होत असतात. त्यासोबतच अनेक अशा आजारांवरतीदेखील हे फायदेशीर आहे. तर याचे काय फायदे होतात किंवा आपण कशा पद्धतीने हा चहा तयार करू शकतो, याविषयी माहिती घेऊ..
हेही वाचा - उन्हाळ्यात काय खाणे चांगले? चिया सीडस् की, तुळशीच्या बिया? कसे खावे, तेही जाणून घ्या
अँटीऑक्सीडंटस्, सांधेदुखीवर उपयुक्त
जास्वंदाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट घटक असतात. ज्यांना मोठ्या प्रमाणात सांधेदुखी होते, अशा रुग्णांसाठी हा चहा अत्यंत असा गुणकारी आहे.
रक्तदाब नियंत्रणास ठेवण्यास मदत
जास्वंदाचा चहा हा बीपी नियंत्रणात ठेवायला मदत करतो. कोलेस्ट्रॉल कमी करायला देखील मदत करतो आणि ज्यांना स्थूलपणा कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा चहा खूप फायदेशीर ठरेल. जर जास्वंदाच्या फुलाचा चहा आपण घेतला तर, खाल्लेल्या पचन देखील चांगले होतं. तसेच यामुळे भूक देखील कमी लागते.
केसांसाठीही गुणकारी
जास्वंदाचे फूल केसांच्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. हर्बल उपचारांमध्ये याचा समावेश होतो. याचा चहा पिणं तर उत्तम आहेच. शिवाय, याच्याशी संबंदित आणखीही काही उत्पादने बाजारात उपलबंध आहेत. यातील तज्ज्ञाच्या सल्ल्याने आपण त्यांचा उपयोग करू शकतो.
कॅफिनसाठी पर्याय
यामध्ये कमी कॅलरीज असतात. ज्यांना कॅफिनला पर्याय हवा आहे, त्यांच्यासाठी हा चहा अत्यंत असा गुणकारी ठरू शकतो किंवा फायदेशीर ठरू शकतो.
यकृताचे आरोग्य चांगले राहते
यकृताचे (Lever) आरोग्य देखील हा चहा चांगले ठेवतो. त्यामुळे तुम्ही हा चहा घेऊ शकता. सध्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडचे चहा उपलब्ध आहेत. तुम्ही कुठलाही चहा घेऊ शकता. हा चहा करताना तुम्ही एक कप चहा करत असाल तर, त्यामध्ये तुम्ही एक टी स्पून जास्वंदाची चहाची पावडर टाकायची आणि उकळून घ्यायचा.
तुम्ही तो साखर न टाकताच घ्यावा. जेणेकरून, तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळतील.
हेही वाचा - पपई न्याहारीमध्ये खाल्ल्याचे मोठे फायदे.. उन्हाळ्यात पचनक्रिया राहील ठणठणीत
जास्वंदाची पूड कशी करावी?
जास्वंदाची फुलं वाळत घालायची आणि त्यानंतर ती चांगली सुकली की, त्याची पावडर करून जरी तुम्ही त्याचा चहा बनवला, तरी देखील चालते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा चहा घेऊ शकता आणि याचे फायदे मिळू शकतात.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)