Sunday, August 31, 2025 07:04:33 AM

गरोदरपणात या गोष्टीचा बाळाच्या मनावर होतो वाईट परिणाम; मूल भित्रे होऊ शकते

आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.

गरोदरपणात या गोष्टीचा बाळाच्या मनावर होतो वाईट परिणाम मूल भित्रे होऊ शकते

Effect of Stress During Pregnancy on Baby : जर तुम्ही गर्भवती असाल किंवा यासाठी तुमचं प्लॅनिंग सुरू असेल, तर तुम्ही ताण-तणाव टाळण्याचा प्रयत्न करावा. होणाऱ्या आईसोबतच घरातील आणि बाहेरच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण, मुले ही त्यांच्या कुटुंबाचे आणि देशाचेही भविष्य आहेत. कारण गरोदरपणात घेतलेला ताण बाळाच्या सर्वांगीण विकासावर वाईट परिणाम करू शकतो. म्हणून ही बाब लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गर्भधारणेदरम्यान आणि गर्भवती झाल्यानंतर आई जे अनुभव घेत असते, ते अनुभव मूलही घेत असते. गर्भवती महिलेवर ओरडणे केवळ तिलाच नाही तर गर्भाशयात वाढणाऱ्या बाळालाही हानी पोहोचवते. प्रत्यक्षात, जेव्हा पती किंवा कोणीही व्यक्ती रागाच्या भरात गर्भवती महिलेवर ओरडते, तेव्हा तिच्या पोटातील बाळ घाबरू लागते. तसेच, आईची यावर जी काही प्रतिक्रिया असेल, तीही ते अनुभवू लागते. यामुळे आईच्या शरीरात जे केमिकल इफेक्टस् होऊ लागतात, ते बाळापर्यंतही पोहोचतात. ताण-तणावामुळे जन्माला येणारे मूल भित्रे, चिडचिडे किंवा आक्रमक बनू शकते. याविषयी अधिक जाणून घेऊ..

ताण संप्रेरके
गर्भवती महिला घाबरते तेव्हा तणाव संप्रेरके वाढतात. या परिस्थितीत महिलेच्या शरीरात 'कॉर्टिसोल' सारखे ताण संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके थेट प्लेसेंटाद्वारे गर्भाशयात वाढणाऱ्या बाळापर्यंत पोहोचतात. त्याचा परिणाम बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. जर गर्भधारणेदरम्यान आई वारंवार किंवा बराच काळ खूप ताणतणावात राहिली तर त्याचा थेट परिणाम बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होऊ शकतो. मूल भित्रे आणि रागीट होऊ शकते. जर आई गर्भवस्थेदरम्यान बराच काळ तणावाखाली राहिली तर त्याचा मुलाच्या स्वभावावरही परिणाम होऊ शकतो. अशी मुले नंतर अधिक चिंताग्रस्त (अस्वस्थ), भयभीत (घाबरलेली) किंवा आक्रमक (रागीट) होऊ शकतात.

हेही वाचा - Intrahepatic Pregnancy : ही गर्भधारणा असते खूप धोकादायक; आईचं यकृत फुटू शकतं!

गरोदरपणात गुंतागुंत होऊ शकते
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात. म्हणून महिलांनी याची काळजी घेतली पाहिजे.

गरोदर महिलेची मानसिक स्थिती आणि आयुर्वेद
गर्भधारणेदरम्यान किंवा गरोदर झाल्यानंतर महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात आणि हार्मोन्सही वेगाने बदलत असतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती थोडीशी बिघडलेली असू शकते. त्यामुळे काही प्रमाणात मूड स्विंग्ज टाळता येत नाहीत. तेव्हा तणावपूर्ण स्थिती टाळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. गर्भधारणेदरम्यान किंवा गरोदर झाल्यानंतर महिला ताण-तणावात असेल तर, त्याचा तिच्या आरोग्यावरच नव्हे तर, गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की आईने गर्भधारणेदरम्यान ताण घेतल्याने बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदातही होणाऱ्या आईचे मन प्रसन्न असण्यावर भर दिलेला आहे.

हे नक्की करा
गरोदर महिलेला प्रेमळपणे वागवावे. तिला प्रेम, आदर आणि भावनिक आधार दिला पाहिजे, जेणेकरून ती तणावापासून दूर राहील. याचा गर्भातील मुलावरही सकारात्मक परिणाम होतो. तसेच, या काळात गर्भवती महिलेने एखादी कला शिकणे आणि त्या माध्यमातून ताण-तणाव कमी करणेही फायदेशीर ठरू शकते. तसेच, धार्मिक ग्रंथांचे वाचनही ताण कमी करते. विविध मंत्र, स्तोत्रे, पाढे मोठ्याने म्हटल्याने मुलाच्या बुद्धीवर (baby's brain development) चांगला परिणाम होतो.

हेही वाचा - दुपारी जेवल्यानंतर डुलकी येते? ही आहे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया.. आजाराचं लक्षण नाही

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री