how to choose good coconut : नारळात पाणी जास्त की मलाई?, ‘या’ सोप्या ट्रिक्सनं सहज ओळखा
how to choose good coconut : आपल्या भारतीय संस्कृतीत नारळाचं स्थान खूप महत्वाचं आहे. सण-उत्सव असो किंवा एखादं पारंपरिक पूजन नारळ हमखास लागतोच. काही लोक नारळातील गोडसर पाण्यासाठी तो खरेदी करतात. तर काहींना त्यातील जाडसर मलाई हवी असते. पण बाजारात गेल्यावर अनेकदा नारळ फोडल्यावर अनेकांच्या निराशा पदरी पडते. कधी नारळात पाणी कमी असतं, तर कधी मलाईच नसते. मग अशा वेळी मनात प्रश्न पडतो. परफेक्ट नारळ ओळखायचा तरी कसा?. मंडळी आम्ही तुम्हाला परफेक्ट नारळ कसा ओळखायचा याच्या ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हीही मिनिटभरात चांगला नारळ ओळखू शकता.
नारळ हलवा, आवाज ओळखा
तुम्ही नारळ हलवून बघा. जर त्यातून पाण्याची छळ-छळ असा आवाज जोरात येत असेल. तर तो नारळ अधिक पाण्याने भरलेला आहे आणि त्यात मलाई कमी असण्याची शक्यता आहे. जर याउलट आवाज कमी येत असेल तर त्या नारळात पाणी कमी आणि मलाई अधिक असण्याची शक्यता असते.
वजनावरून घ्या अंदाज
नारळ हातात घेऊन त्याचे वजनाचा अंदाज घ्या. हलका नारळ म्हणजे पाणी भरपूर पण मलाई कमी. भारी वाटणारा नारळ बहुतांश वेळा अधिक काळ साठवलेला असतो. ज्यात पाणी कमी होऊन मलाई तयार झालेली असते.
नारळाच्या डोळ्यांवरून लावा अंदाज
नारळाच्या वरच्या भागावर तीन गोलसर गडद ठिपके असतात. त्यांना डोळे म्हणतात. हे डोळे जर कोरडे, गडद आणि जरा जास्त घट्ट वाटत असतील तर तो नारळ जुना आहे आणि त्यात मलाई अधिक असण्याची शक्यता आहे. पण जर हे डोळे मऊसर, हलके आणि थोडेसे दमट वाटले तर तो ताजा नारळ असून त्यात पाणी भरपूर असू शकतं.
हेही वाचा - गूगल पे-फोनपेचे डुप्लिकेट अॅप्स बाजारात; फसवणुकीपासून वाचायचंय? मग हे वाचाच
सालीची चमक तपासा
नारळाची बाहेरची साल जर गुळगुळीत आणि थोडीशी चमकदार वाटत असेल. तर नारळ ताजा असण्याची शक्यता असते. म्हणजे यात पाणी जास्त असू शकतं. जर साल कोरडी, खवखवीत किंवा जरा खवलेली वाटत असेल तर नारळ जुना आणि मलाईदार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - अंडरवेअरशिवाय घराबाहेर पडलात तर थेट जेल; जाणून घ्या 'या' देशाचे विचित्र नियम
विक्रेत्याचा अनुभव
जर नेहमीच तुमच्या एरिया मध्ये नारळ विकणारा एकच दुकानदार असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवता येईल. अनुभवी विक्रेते बहुतेक वेळा ग्राहकाच्या गरजेनुसार नारळ निवडून देतात. पण त्यांना फक्त थोडं हसून विचारायचं. तुम्ही अशा ट्रिक्स वापरून परफेक्ट नारळाची चॉईस करू शकता.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही.)