रायगड: रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता रायगडमध्ये चर्चा आहे ती एका बँनरची. मंत्री आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर पुन्हा एकदा फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या बँनरमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरु आहे. रायगडचा पालक मंत्री कोण यावरून आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु आहे. त्यातच आता अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फलकावर फिक्स पालकमंत्री असा उल्लेख असल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. आदिती तटकरे यांचा माणगावमध्ये लागलेला हा बॅनर महायुतीमध्ये वादाचे कारण ठरण्याची शक्यात निर्माण झाली असून आता पुढे हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.
हेही वाचा: मुंबईकरांची स्वप्नपूर्ती होणार! 12 लाखांत पूर्ण होणार घराचं स्वप्न
कोण आहेत अदिती तटकरे ?
राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांचा आज वाढदिवस.
आदिती तटकरे यांनी अनेक मंत्रिमंडळात विविध खात्यांचा भार सांभाळत, आपल्या कामाला न्याय दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या.
वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी त्यांच्यावर राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क अशा विविध खात्याचा पदभार त्यांनी सांभाळला.
2011-2012 मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवण्यासाठी तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं.
या आवाहनाला प्रतिसाद देत, आदिती या राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी जोडल्या गेल्या. यानंतरच त्यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
दरम्यान रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता रायगडमध्ये चर्चा आहे ती एका बँनरची. मंत्री आदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर पुन्हा एकदा फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या बँनरमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरु आहे.