कोल्हापूर: पहाटेपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत मोठी दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन कक्ष यंत्रणांनी तातडीने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. तसेच, वाहतुकीसाठी एकेरी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा: AHMEDABAD PLANE CRASH: विमान अपघातातून अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली
भुईबावडा घाटाचे वैशिष्ट्य:
कोल्हापूर ते सिंधुदुर्गला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा, करूळ आणि भुईबावडा असे घाट मार्ग आहेत. त्यापैकी आंबोली, फोंडा आणि करूळ या घाटमार्गाचा वापर अधिक होतो. मात्र, भुईबावडा घाट काहीसा दुर्लक्षितच राहिलेला आहे. परंतु, पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने भुईबावडा घाटात येतात. वैभववाडी तालुक्यातून गगनबावडा घाटात जातानाही थोडीशी वाट वाकडी करून भुईबावडा घाटातून जाता येते. घाटाची लांबी 9 ते 10 किलोमीटर जरी असले तरीदेखील तिथल्या नैसर्गिक विविधतेमुळे घाटाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
हेही वाचा: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 22 वर्षीय इरफान शेखचा मृत्यू